breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांची होणार महाआरोग्य तपासणी; आमदार जगताप यांची माहिती

  • रुग्णांना नावनोंदणी करणे आवश्यक 
  • रहिवासी पुरावे घेऊन येण्याच्या सूचना

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १३ जानेवारी दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी मोफत अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने कळविण्यात आली आहे. या शिबीरात रुग्णांना झालेल्या गंभीर आजारावर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे. ह्दयरोग, किडनी तसेच कॅन्सर आजारावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सलग तीन दिवस हे महाआरोग्य शिबीर भरविण्यात येणार आहे. या शिबीरात ह्दयरोग व शस्त्रक्रिया, किडनी, हाडांचे व मणक्याचे आजार, कॅन्सर व शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, मोफत श्रवणयंत्रे, मेंदूच्या आजारावरील शस्त्रक्रिया, गरोदर मातांना व्हॅक्सिन, आयुर्वेदिक उपचार, मूत्र मार्गाचे विकार, त्वचाविकार, फाटलेली टाळू व ओठावरील शस्त्रक्रिया, बॉडी चेकअप, एपिलिप्सी, कान-नाक-घसा तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, रक्तदाब, स्त्री-रोग, हिमोग्लोबिन तपासणी, राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत समाविष्ट होणारे सर्व आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, मोफत अॅन्जिओग्राफी, अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, मोफत चष्मे वाटप केले जाणार आहे.

ह्दयरोग, किडनी विकार व प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, कॅन्सर रोगाशी निगडीत शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत

या महाआरोग्य शिबीरात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी रेशनिंग कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना किंवा आधार कार्ड आणणे गरजेचे आहे. तसेच, पूर्वी काही आजार असल्यास तसेच त्या आजारावर झालेल्या उपचाराचे रिपोर्ट आणणे आवश्यक आहे. डॉ. देविदास शेलार (८९९९२८४८९५), डॉ. ननावरे (९८२२१८६८०५), आदिती निकम (९७६२३५३६३७), सतीश कांबळे (८२०८४८७७२३), डॉ. दत्तात्रय देशमुख (८६५७१८८६५७) आणि मनीष कुलकर्णी (७०५७५५५५५५) यांच्याशी संपर्क साधून महाआरोग्य शिबीरासाठी नाव नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button