breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरीत साखळी चोरांचा धुमाकूळ

पिंपरी –  पुणे आणि पिंपरीत बुधवारी साखळीचोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. वटवृक्षाची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या दागिन्यांवर साखळीचोरांनी डल्ला मारला असून बुधवारी शहरात बाईकवरुन आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र आणि दागिने चोरल्याच्या १२ घटना घडल्या आहेत.

महाराष्ट्रात आज वटपौर्णिमेचा उत्साह आहे. नवीन साडी आणि दागिने घालून महिला घराबाहेर पडल्या आहेत. पुणे आणि पिंपरीतही बुधवारी असेच चित्र होते. मात्र, याचा गैरफायदा सोनसाखळी चोरांनी घेतला. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे सौदागर तर पुण्यात शिवाजीनगर आणि कोंढाव्यात या ठिकाणी सोन साखळी चोरांनी थैमान घातले आहे. दुचाकी वरून आलेल्या दोघांनी सांगवी परिसरात सोन साखळी हिसकावल्या आहेत. याचा तपास सांगवी पोलीस, वाकड पोलीस करत आहेत. महिलांनी संशयास्पद व्यक्ति फिरताना दिसल्यास तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button