breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती  पिंपरीत आज (रविवार) उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास आंबेडकरी जनतेने प्रचंड गर्दी केली आहे. 

पिंपरी चिंचवड शहर व परिसरातून आलेल्या आंबेडकर जनतेने डॉ. आंबेडकर यांच्या  पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी विविध उपक्रमांव्दारे महामानवाला अभिवादन केले. तर भारिप बहुजन महासंघ, दलित पॅंथर, लोकजनशक्ती पार्टी, भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महामानवाला अभिवादन केले.

आंबेडकर चौक परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.  शहराच्या विविध भागांमधून  काढलेल्या मिरवणुकांमुळे मोरवाडी चौकातून आंबेडकर पुतळ्याकडे येणारी लेन वाहतूकीसाठी बंद करण्यात आली होती.  महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना भीम अनुयायांनी दिवसभर गर्दी केली होती. अनुयायांना  सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विविध पक्ष, संघटना व सामाजिक संस्थांनी  मोठे सहकार्य केले.

आंबेडकर जयंतीनिमित्त  आंबेडकर यांच्या पुस्तकांचे आणि साहित्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉलवर अनुयायींनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. तसेच आंबेडकर यांचे फोटो, मूर्ती खरेदी करण्यास अनुयायींनी पसंती दिली. तसेच वही पेन संकलनाच्या आवाहनाला अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला.  हजारो वही पेन संकलित झाले.  हे सर्व साहित्य राज्यभरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून दान केले जाणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button