breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीत दुचाकी घसरून विद्यार्थ्याचा मृत्यू

पिंपरी – दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना काळभोरनगर येथे शुक्रवारी सकाळी घडली

प्रशांत सीताराम कांबळे (वय १६, रा. काळभोरनगर, आकुर्डी) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास प्रशांत दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी त्याची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button