breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीगावात शितळादेवी मूर्तीची भव्य मिरवणूक 

पिंपरी,  (महाईन्यूज) – पिंपरीगावातील शितळादेवी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ बुधवारी (दि. 19) सकाळी सात वाजता करवीर पिठाचे श्रीमद्‌ जगद्‌गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानिमित्त सोमवारी (दि. 17) श्री. शितळादेवी मूर्तीची व कलशाची भव्य मिरवणुक पिंपरी गावातील तपोवन मंदिरपासून माळी आळी, कापसे आळी, वाघेरे आळी, वाघेरे कॉलनी एक ते चार, न्हावी आळी, सटवाई मंदिर, महालक्ष्मी मंदिर, भैरवनाथ मंदिर या परिसरातून वाजतगाजत काढण्यात आली. यावेळी निमंत्रक नगरसेवक संदीप वाघेरे, वसंत दत्तोबा नाणेकर, किसन कापसे, चिंधाजी गोलांडे, चंद्रकांत गव्हाणे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, राम कुदळे, हरीश वाघेरे, कैलास वाघेरे, राजेंद्र वाघेरे आदींसह हजारो भक्त भाविक उपस्थित होते.

पिंपरीगावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात मंगळवारी (दि. 18) सकाळी साडेआठ वाजता प्रासाद वास्तू मंडल स्थापना, मुख्य देवता स्थापना, कुंड संस्कार, नवग्रह स्थापना, ग्रह होम, वास्तू होम, पर्याय होम, सायंकाळी 5 वाजता सप्तसती पाठ व पूजा मंत्रा पुष्प आणि मुख्य समारंभ बुधवारी सकाळी 7 नंतर स्थापित देवता पूजन, कलश स्थापन, प्रायश्चित होम, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलाशारोहण समारंभ, पूर्णाहूती, महापूजा, महानैवेद्य व सायंकाळी पाचनंतर महाप्रसाद असा धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button