breaking-newsआंतरराष्टीय

पावसामुळे चीनच्या ऐतिहासिक भिंतीचा भाग कोसळला

बीजिंग (चीन) – सततच्या जोरदार पावसामुळे चीनच्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक भिंतीचा काही भाग कोसळला आहे. यलो नदीजवळ चालू असलेले बांधकाम भिंत कोसळण्याचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. शांक्‍सी प्रांतात दाई काऊंटीतील यान्मेन प्रवेशद्वाराजावळील भिंतीचा भाग कोसळला आहे. भिंत कोसळल्यानंतर हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. सन 1368-1644 या काळात चीनच्या मिंग राजवटीने ही भिंत उभारली होती.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार गेली 500 वर्षे यान्मेन प्रवेशद्वार कोणत्याही आधाराविना उभे होते. सन 2016 मध्ये त्याचे नूतनीकरण आणि डागडुजी करण्यात आली. दुरुस्तीमुळे भिंत अधिक कमकुवत झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. 21,200 किमी लांबीची ही भिंत चीनच्या चीनच्या 15 प्रांतांमधून जाते. या भिंतीच्या बेजिंगजवळील भागाला दररोज सर्वाधिक, सुमारे वीस हजार पर्यटक भेट देतात.

चीनच्या पश्‍चिमोत्तर भागात विक्रमी पाऊस झाला आहे. या पावसाने आलेल्या पुराने 20 बळी घेतले असून सुमारे 8700 घरे कोसळली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button