breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुंदन गायकवाड यांना पालिकेची नोटीस; मानधनाची रक्कम भरावी लागणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्दचा निर्णय आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी घेतल्याने नगरसेवक पदावर असताना त्यांनी उपभोगलेल्या लाभाची रक्कम पालिकेला जमा करण्याची नोटीस प्रशासनाने गायकवाड यांना पाठविली आहे. त्यामुळे गायकवाड यांना आडीच लाख रुपये जमा करावे लागणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून कुंदन गायकवाड यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. निवडणुकीत ते निवडूनही आले. मात्र, त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालयाने पडताळणी समितीच्या निर्णयावर ठपका ठेवला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आयुक्त हार्डीकर यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्दचा निर्णय घेतला. गायकवाड यांनी जवळपास दोन वर्षाचा कार्यकाळ उपभोगला आहे. त्यांनी अधिकारापोटी दर महिन्याचे 15 हजार रुपये मानधन आणि सभा भत्ता (प्रतिसभा 100 रुपये) घेतले आहे. या मानधनापोटी 2 लाख 54 हजार 968 रुपये जमा करण्याची नोटीस प्रशासनाने त्यांना पाठविली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी यांनी देखील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येऊन नगरसेवक पदाचा उपभोग घेतला होता. जवळपास साडेचार वर्षे पदावर राहून त्यांनी पालिकेतील महत्वाची पदे घेतली होती. शेवटच्या सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पद रद्द झाल्याने त्यांच्याकडून साडेचार वर्षात उपभोगलेल्या फायद्यांची रक्कम जमा करवून घेण्यात आली होती. त्यांच्या जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी नगरसेवक राम पात्रे यांचा विजय झाला होता. तसेच, भोसरीच्या माजी नगरसेविका सीमा फुगे यांचे देखील पद जात पडताळणी आक्षेपार्ह प्रकरणामुळेच रद्द झाले होते. निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यातच त्यांचे पद रद्द झाल्याने त्यांच्या जागी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका श्रध्दा लांडगे या निवडून आल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button