breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालखी सोहळ्यानिमित्त महापौर, आयुक्तांनी केली रस्त्याची पाहणी

पिंपरी, (महाईन्यूज) – आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त देहु कमान विठ्ठलवाडी मार्ग, तसेच देहू कमान ते झेंडेमळा मनपामार्फत शासनाच्या हद्दीमध्ये नव्याने डांबरीकरण करत असलेल्या रस्त्याची पहाणी महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केली.

विठ्ठलवाडी येथे शासनामार्फत (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) सुरु असलेले काम हे पालखी सोहळा दोन दिवसावर आलेला असताना संथ गतीच्या कामाबाबत महापौरांनी नाराजी व्यक्त केली. या कामाबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता काम तातडीने पुर्ण करण्याकामी मनपाच्यावतीने संबंधीत विभागांना पत्र दिलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या पालखी सोहळा बैठकीमध्ये सदर काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधीत विभागाला सुचना दिलेल्या होत्या. तरी, काम पूर्ण झालेले नाही. याबाबत संबंधीत ठेकेदाराला दोन दिवसात काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

पालखी सोहळा दोन दिवसावर आलेला असताना पालखी मार्ग तातडीने पूर्ण न झाल्यास मनपाच्या वतीने तात्पुर्त्या स्वरूपात दुरूस्ती करावी, अशा सुचना महापौर व आयुक्तांनी दिल्या आहेत. रस्ता दुरूस्ती करण्याकरीता काही काळ बंद ठेवावा लागणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

यावेळी मनपाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, उपअभियंता संजय काशीद इत्यादी अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते रोहिदास गाडे, बाळासाहेब काळोखे, नवनाथ टिळेकर, संभाजी घारे हे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button