breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘पार्थ’च्या विजया’साठी जगतापांचे ‘साईबाबां’ना साकडे

  • नवी सांगवीत साई भक्तांकडून फ्लेक्सबाजी
  • नगरसेवक नवनाथ जगतापांनी केले ब्रॅंडींग

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच पार्थ पवार हे स्वता: छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतून नाराज होवून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी देखील पार्थ पवारांना स्विकारण्यास सुरुवात केली आहे. पार्थमुळे अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते गट-तट विसरुन एकत्र येवू लागले आहेत. त्यातच सांगवी परिसरात बॅनर झळकले असून त्यावर पार्थ पवारांना भावी खासदार म्हणून संबोधले आहे. तसेच, शिवसेना गटनेते राहूल कलाटे देखील पार्थ पवारांसोबत झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

सांगवी येथील ओम साई ट्रस्टच्या वतीने साई मंदिरचा 16 वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि.15) साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात श्री साईंची महाआरती पार्थ पवार यांचे हस्ते होणार आहे.  या कार्यक्रमाला शिवसेना गटनेते राहूल कलाटे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त सांगवी, नवी सांगवी परिसरात अपक्ष नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप यांनी सर्वत्र फ्लेक्सबाजी केली आहे. त्यावर भावी खासदार म्हणून पार्थ पवार यांचा प्रसार व प्रचार सुरु केला आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी, विविध कार्यक्रमांना हजेरी लावून निवडणुक पुर्व माहोल तयार केल जात आहे. पार्थ पवारांच्या संभाव्य उमेदवारीमुळे राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते गट-तट विसरुन कामाला लागले आहेत. त्यामुळे विरोधकांनी पार्थ यांच्या उमेदवारीचा चांगलाच धसका घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button