breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पान खरेदी करताना झालेल्या पैशांच्या वादातून तरुणावर वार

 पान टपरीवर पान खरेदी करताना पैशांवरून वाद झाला. यामध्ये दोघांनी मिळून तरुणाला मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री नऊच्या सुमारास खुशबू पान शॉप, हिंजवडी येथे घडली.

चैतन्य भगवान डुकरे (वय 22, रा. मुकाई नगर, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश साखरे व खुशबू पान शॉपवरील एक मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य हिंजवडी मधील एका खाजगी कंपनीमध्ये काम करतात. ते शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मेझा – 9 चौक ते शिवाजी चौक दरम्यान असलेल्या खुशबू पान शॉपवर पान खरेदी करण्यासाठी गेले. पान खरेदी करताना पैशांवरून चैतन्य आणि पान शॉपवरील एक मुलगा यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. याचा राग मनात धरून गणेश साखरे आणि पान शॉप वरील मुलगा या दोघांनी मिळून चैतन्य यांना प्लास्टिक पाईपने मारहाण केली. लोखंडी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. यामध्ये चैतन्य गंभीर जखमी झाले. यावरून दोघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button