breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाण्याची तक्रार केल्याप्रकरणी एकाला मारहाण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सोसायटीत पाणी आले नसल्याची तक्रार केल्यानंतर एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुरूवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

संतोष दोडके (वय 43, रा. धीरज गोल्ड अपार्टमेंट, पिंपळे निलख, सांगवी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमोल कामटे, विशाल कामटे, प्रतीक दळवी, गणेश (पूर्ण नाव माहिती नाही) या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडके यांच्या सोसायटीमध्ये गुरुवारी पाणी कमी आले. याची तक्रार घेऊन ते नगरसेवकाच्या विनायकनगर पिंपळे निलख येथील जनसंपर्क कार्यालयात गेले होते. त्यांनी आपली तक्रार अमोल कामठे याच्याकडे तोंडी केली. रात्री साडेआठच्या सुमारास दोडके घरी जेवण करत होते, त्यावेळी गणेश याने दोडके यांना सोसायटीच्या पार्किंग परिसरात बोलावले. पार्किंग परिसरात अमोल, विशाल, प्रतीक आणि त्यांचे काही साथीदार होते. ‘तुम्ही दरवेळेस पाण्यासाठी ऑफिसमध्ये येऊन तक्रारी का करता’ असे म्हणत सर्वांनी मिळून संतोष दोडके त्यांचा मुलगा प्राणिकेत (वय 19) याला देखील मारहाण केली. तसेच, दोडके यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली, असे तक्रारीत नमूद केले आहे. यावरून दोडके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, वैयक्तिक कारणावरून भांडण झाले असून त्याचा आपल्याशी कसलाही संबंध नाही. हे भांडण माझ्या कार्यालयात झालेले नसून इमारतीमध्ये झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करावेत. भांडण करणारे आपल्या कार्यालयातील कर्मचारी नाहीत, असे स्पष्टीकरण नगरसेवक तुषार कामठे यांनी दिले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button