breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानी तालिबानने नेमला नवा प्रमुख

इस्लामाबाद -अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला मारला गेला. त्यानंतर त्या संघटनेने मुफ्ती नूर वली मेहसुद याला नवा प्रमुख बनवले आहे.
पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेची सुत्रे स्वीकारलेल्या मेहसुदचा नेमका ठावठिकाणा समजू शकलेला नाही. मात्र, तो अफगाणिस्तानमध्ये कुठेतरी दडल्याचा अंदाज आहे. तो 2014 मध्ये झालेल्या एका ड्रोन हल्ल्यावेळी बचावला होता. तो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी आहे.

त्याने पाकिस्तानातील विविध धार्मिक संस्थांमध्ये शिक्षण घेतले. त्याने काही काळापूर्वी उर्दूतून एक पुस्तकही लिहिले. त्यात त्याने पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येत पाकिस्तानी तालिबान सामील असल्याचा दावा केला होता. त्याकडे तालिबानकडून देण्यात आलेली पहिलीच कबुली म्हणून पाहिले गेले. भुट्टो यांची 2007 मध्ये रावळपिंडीत हत्या करण्यात आली. खंडणी, अपहरण आणि हत्येच्या माध्यमातूून तालिबानसाठी पैसा गोळा करण्यात येतो, अशी कबुलीही मेहसुदच्या पुस्तकातूून देण्यात आली होती. आता नव्या प्रमुखाची निवड झाल्याने पाकिस्तानी तालिबानच्या कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button