breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानच्या संरक्षण निधी कपातीला अमेरिकेत मंजूरी

वॉशिंग्टन – पाकिस्तानला देण्याच्या संरक्षण मदतीमध्ये 150 दशलक्ष डॉलरची कपात करण्याच्या विधेयकाला अमेरिकेच्या संसदेमध्ये मंजूरी देण्यात आली. यामुळे पाकिस्तानला दरवर्षाला 1 अब्ज डॉलर इतकी दिली जाणारी संरक्षण विषयक मदत आता लक्षणीयरित्या कमी होणार आहे. हक्कानी नेटवर्क आणि लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांवर कारवाईसाठी गेल्या काही वर्षांमध्ये ही मदत दिली गेली आहे.

यापूर्वी गेल्यावर्षी पाकिस्तानला 700 दशलक्ष डॉलरची संरक्षण मदत दिली गेली होती. ओबामा प्रशासनाच्या काळात पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधातील कारवाईसाठी 1.2 अब्ज डॉलरचे संरक्षण सहाय्य मिळत असे. मात्र पाकिस्तानकडून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवई होत नसल्याच्या आरोपामुळे अध्यक्ष ट्रम्प यांनी अशी भरघोस मदत देण्यास तीव्र आक्षेप घेतला होता. अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कला पोसले जात असल्याच्या आक्षेपावरून पाकिस्तानला 1.15 अब्ज डॉलरचे संरक्षण सहाय्य देण्याचा निर्णयही अमेरिकेने जानेवारीमध्ये रद्द केला.

यंदाही संरक्षण निधी देताना पाकिस्तानकडून हक्कानी नेटवर्कवरील कारवाईचे प्रमाणपत्र घेण्याची तरतूद मात्र वगळण्यात आली आहे. आता दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचे कोणतेही साधन पेंटॅगॉनकडे असणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button