breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानच्या विरोधात ब्रिट्‌नमध्ये डोगरा समाजाची निदर्शने….

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये डोगरा समाजाच्या नागरिकांनी पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने केली आहेत पाकिस्तानकडून सतत होत असलेला शस्त्रसंधीभंग आणि पाकिस्तानी लष्कर करत असलेला गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा यामुळे सीमाभागातील भारतीय नागरिकांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे होणारी मानवी जीवनाची हानी आणि साधनसंपत्तीचे नुकसन याच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आलेली आहेत. लंडनमध्ये राहणाऱ्या डोगरा समाजाच्या नागरिकांनी निदर्शने केली आहेत.

रमजानच्या पवित्र महिन्यातही लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमाभागात सतत गोळीबार आणि तोफांचा मारा चालू आहे. पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात नितीन नावाचे 8 महिने वयाचे एक बालक आःणि 8 वर्षे वयाच्या कृष्णा नावाच्या मुलाच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या विरोधात देशात आणि देशाबाहेरही प्रचंड क्षोभ उसळलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button