breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार 400 अब्ज रुपयांचा मालक

इस्लामाबाद (पाकिस्तान) -पाकिस्तानातील आगामी निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराची मालमत्ता 400 अब्ज पाकिस्तानी रुपयांची असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानची लोकसभा आणि पंजाब प्रांताची निवडणूक लढवण्याऱ्या मोहम्मद हुसेन शेख यांनी आपली मालमत्ता 400 अब्ज रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा केला आहे. मोहम्मद हुसेन शेख हे एएनए 182 आणि पीपी270 या दोन ठिकाणांहून निवडणुक लढवत आहेत.

लंग मलाना, तलीरी, चक तलीरी आणि लटकारन या इलाख्यांप्रमाणेच मुजफ्फरगडमधील 40 टक्के जमिनींचे मालकी हक्क आपल्याकडे असल्याचा दावा मोहम्मद हुसेन शेख यांनी केला आहे. या जमिनीबाबत गेली 88 वर्षे कोर्टान खटला चालू होता. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फैसल अरब आणि न्यायाधीश उमर अट्टा बांदियाल यांच्या खंडपीठाने आपल्या बाजूने निकाल दिल्याचे मोहम्मद हुसेन शेख यांनी सांगितले. या जमिनीची किंमत 400.11 अब्ज पाकिस्तानी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

नामांकन पत्रांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या मालमत्तेनुसार मोहम्मद हुसेन शेख हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत, पीएमएल (पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) नेते मरीयम नवाझ शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते भुट्टो जरदारी व आसिफ अली जरदारी यांनी आपली मालमत्ता अब्जावधी रुपयांची असल्याचे जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button