breaking-newsआंतरराष्टीयमहाराष्ट्रमुंबई

पाकिस्तानच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

२६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोन पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल या दोघांविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने नुकतेच अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. मुंबई पोलिसांनी ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात पाशा आणि इक्बाल या दोघांनाही फरारी आरोपी दाखवले आहे.

या प्रकरणी माफीचा साक्षीदार बनलेला आणि सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याच्या जबाबाचा दाखला देत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पाशा आणि इक्बाल यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती. हेडलीने जबाब देताना पाशा हा सेवानिवृत्त झाला असून इक्बाल अद्यापही आयएसआय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचा आणि दोघेही मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सहभागाविषयी असल्याचा खुलासा केला होता.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. यरलागड्डा यांनी पोलिसांच्या अर्जाची दखल घेत तो मान्य केला. हेडलीने त्याच्या जबाबात पाशा आणि इक्बालचा उल्लेख केल्याचेही न्यायालयाने नमूद केले. विशेष न्यायालयासमोर सध्या सय्यद झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्याविरोधात ‘२६/११’च्या दहशतवादी खटल्याची सुनावणी सुरू आहे.

विशेष न्यायालयासमोर हेडली याचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यात आला होता. त्या वेळी पाकिस्तानने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना केवळ निधीच उपलब्ध केला नाही, तर पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांचा हल्ल्याच्या कटात सक्रिय सहभाग होता, असेही हेडलीने सांगितले होते.

हेडलीच्या जबाबाशिवाय इतरही पुरावे 

हेडलीने दिलेल्या जबाबानुसार, दहशतवादी हल्ल्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला पाशा आणि इक्बाल दोघेही हजर होते. या बैठकीला साजिद मीर, अबू काहफा आणि झकी-उर रहमान लख्वी हेही उपस्थित होते. या दोघांचा सहभाग स्पष्ट करणारा हेडलीच्या पुराव्याशिवाय अन्य पुरावाही आपल्याकडे आहे, असा दावा निकम यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button