breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानकडून 471 भारतीय कैद्यांची यादी सुपूर्द

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये कैद 471 भारतीय कैद्यांची यादी नुकतीच भारतीय दूतावासाला सोपवण्यात आली. यात 418 मच्छिमारांसोबतच पाकिस्तानची सागरी सीमा अवैधपणे ओलांडल्याने अटक करण्यात आलेल्या 53 जणांचा समावेश आहे. दोन्ही देशांदरम्यान 21 मे 2008 रोजी झालेल्या करारांतर्गत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. करारांतर्गत वर्षातून दोनवेळा म्हणजेच पहिली जानेवारीमध्ये तर दुसरी यादी जुलै महिन्यात पुरवली जाते.

भारत देखील पाकिस्तानी दूतावासाला लवकरच तुरुंगांमध्ये कैद असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी सोपविणार आहे. उरी येथील सैन्यतळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. पाकिस्तानने इराणच्या सीमेतून कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून अटक केल्याने भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button