breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानकडून स्वातंत्र्यदिनाची भेट, ३० भारतीय कैद्यांची करणार सुटका

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच स्वातंत्र्यदिन दिनी भारताला एक खास भेट देणार आहे. पाकिस्तान त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच आज ३० भारतीय कैद्यांना मुक्त करणार आहे. मुक्त करण्यात येणाऱ्या ३० जणांमध्ये २७ मच्छीमारांचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, मानवतावादी विषयांमध्ये राजकारण नको अशी पाकिस्तानची भूमिका असल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. भारताकडूनही अशाच प्रकारच्या वागणुकीची आम्हाला अपेक्षा असल्याचेही या पत्रात पाकिस्तानने म्हटले आहे. मागील महिन्यामध्ये पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूका जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या इम्रान खान यांनी भारताबरोबरचे सर्व वाद संवादाने सोडवण्यात पाकिस्तानला सर असल्याचे मत नोंदवले होते.

भारत आणि पाकिस्तानचे मच्छीमार अनेकदा दिशा भरकटल्याने एकमेकांच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशाच्या सागरी सीमेमध्ये प्रवेश करतात. सागरी सीमा योग्य प्रकारे दर्शवण्यात अडचणी येत असल्याने असले प्रकार अनेकदा होतात. दोन्ही अशाप्रकारे अनावधानाने सीमा ओलांडून आलेल्या मच्छीमारांना अटक करुन बराच काळ कैदी म्हणून तुरुंगात डांबून ठेवतात. दोन्ही देशांमधील वाद आणि सतत उडणाऱ्या खटक्यांमुळे अशाप्रकारे अटक कऱण्यात आलेले अनेक मच्छीमार तुरुंगात अनेक महिने अडकून राहतात. मात्र अनेकदा एखाद्या विशिष्ट दिवसाचे औचित्य साधून दोन्ही देशांकडून अशाप्रकारे अटक कऱण्यात आलेल्या मच्छीमारांची सुटका करुन त्यांना मायदेशी पाठवण्यात येते. जगभरातील अनेक मानवतावादी संस्थांनी अशाप्रकारे निष्पाप मच्छीमारांना तुरुंगवास होऊ नये म्हणून भारत आणि पाकिस्तानने समुद्री सीमा निश्चित करव्यात अशी मागणी करत आहेत.

कुटुंबाबरोबर वाद झाल्यानंतर रागाच्या भरात भारत- पाकिस्तान सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या जितेंद्र अर्जूनवार या २० वर्षीय भारतीय सैनिकाची पाकिस्तानने ३ मे रोजी सुटका केली होती. २०१३ साली सीमारेषा ओलांडून गेलेल्या जितेंद्रने तब्बल पाच वर्षाचा तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला या वर्षी ३ मे रोजी भारतात परत पाठवण्यात आले.

ANI Digital

@ani_digital

As a humanitarian gesture to mark Pakistan’s Independence Day on August 14, Islamabad will release 30 Indian prisoners, including 27 fishermen

Read @ANI Story | https://www.aninews.in/news/world/asia/pak-to-free-30-indian-prisoners-today201808131241220001/ 

इम्रान खान यांनी निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर दिलेल्या पहिल्याच भाषणामध्ये भारताबरोबरचे वाद संवादाने सोडवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे सांगितले होते. काश्मीरसारखा मुद्दाही दोन्ही देशांनी संवादाने सोडवावा असेही इम्रान यावेळी म्हणाले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इम्रान खान यांना विजयाबद्दल शुभेच्छा देत पाकिस्तानमधील नवीन सरकार दहशवादमुक्त, शांतताप्रिय आणि भारतीय उपखंडातील शांततेच्या दृष्टीने काम करेल अशी आशा व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button