breaking-newsक्रिडा

पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांचा पदकावर वेध, एअर रायफल प्रकारात अपुर्वी चंदेला-रवी कुमारला कांस्यपदक

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजपटूंनी पदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर रायफल सांघिक प्रकारात भारताच्या अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्य पदकाची कमाई केली. अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांची कडवी झुंज मोडून काढत भारतीय जोडीने कांस्यपदकाची कमाई केली आहे. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये भारतीय जोडीने या स्पर्धेत आपला दुसरा क्रमांक राखून ठेवला होता. मात्र चीनच्या जोडीने धमाकेदार पुनरागमन करत भारतीय जोडीला तिसऱ्या स्थानावर ढकललं. अखेरच्या क्षणांमध्ये चीनची झुंज मोडून काढण्यात भारतीय जोडी काही गुणांनी मागे पडली. यंदाच्या एशियाडमधलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button