breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे – दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी तसेच दुचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज स्विकारण्यात येणार आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक हवे असतील त्यांनी दि. 30 जुलै 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहीत नमुन्यात अर्ज करावा. अर्ज प्रादेशिक कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी.डी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. डी.डी. R.T.O Pune या नावाने राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बॅंक, पुणे येथील असणे आवश्‍यक आहे. डीडी हा अर्जदाराने स्वत:च्या बॅंक खात्यातून काढल्याचे हमी पत्र जोडणे आवश्‍यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत फोटो ओळखपत्र, उदा. आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाच ओळखपत्र किंवा पासपोट, पॅन कार्ड आदीची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्‍यक आहे.

दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीन पट शुल्क भरून राखून ठेवण्याकरीता एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. 31 जुलै 2018 रोजी लावण्यात येईल. लिलावाकरिता जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात प्रादेशिक कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 4.30 वा. सहकार सभागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सहा. प्रादेशिक अधिकारी यांच्या उपस्थित पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल, असे प्रसिध्दी पत्रकाद्वामध्ये नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button