breaking-newsराष्ट्रिय

पश्‍चिम बंगाल मध्ये काटकसरीच्या उपाययोजना

कोलकाता – पश्‍चिम बंगाल सरकारने सरकारी खर्चात मोठी काटकसर करण्याचे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वारंवार दिल्लीला जाणे, सरकारी खर्चाने वारंवार बैठका घेणे, अनावश्‍यक दौरे करणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. कशा प्रकारे सरकारी खर्चात काटकसर करता येणे शक्‍य आहे याची माहिती देणारे एक परिपत्रकही सरकारने जारी केले आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये नवीन पदे निर्माण करण्यास आणि नवीन वाहने खरेदी करण्यास मनाई करण्यात आली आहे. सरकारी कामांसाठी बैठका घेणे गरजेचे असेल त्या ठिकाणी अत्यंत साधे जेवण दिले जावे असे निर्देशही या परिपत्रकात देण्यात आले आहेत. राज्याची अर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अशा उपाययोजना राज्य सरकारने हाती घेतल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button