breaking-newsपिंपरी / चिंचवड

पवना जलवाहिनीला विरोधच ; शेतकऱ्यांनी केला पालकमंत्र्यांचा निषेध

पिंपरी –  पिंपरीतील एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पवना बंद जलवाहिनी हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. या दुटप्पी भूमिकेचा शेतक-यांनी निषेध व्यक्त करुन बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. पवना बंद जलवाहिनीला विरोध करण्यासाठी समितीची बैठक पार झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यात आला. काही झाले तरी बेहत्तर, पण ज्या आंदोलक शेतक-यांवर गुन्हे दाखल झाले आहे ते लवकरात लवकर मागे घ्या, असे ठराव एकमताने मंजूर केले. यावेळी तळेगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, पांडुरंग ठाकर, गुलाब वरघडे, भारत ठाकूर, गणेश धनिवले,अमित कुंभार, अनिल तुपे, संदीप भुतडा, नितीन बुटाला, गणेश ठाकर,किसन खैरे,शिवाजी सुतार, सुदाम घारे,अजित चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी पवना धरणाच्या पाण्याला येथील स्थानिक बळीराजा कदापीही हात लावू देणार नाही. पिंपरी- चिंचवड पालिकेला गहुंजेवरून पाणी घेऊन जावे, यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय नाही. १९७२ पासून पाणी देतोय तर पाणी प्या, परंतु पवित्र पवना माईला जर कोणी गटारगंगा करायचा घाट घातला तर त्याला पण आम्ही सोडणार नाही. असे
पवना बंद जलवाहिनी समितीचे ज्ञानेश्वर दळवी यांनी सांगितले. तर  ज्या वेळी भाजपा नेते बोलत होते, की जर आमचे सरकार जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आले, तर पवना बंद जलवाहिनी प्रकल्प हद्दपार करू व शेतक-यांवरील गुन्हे मागे घेऊ आणि आता जर आपण शेतक-यांना गाजर दाखवत असाल, तर हे माणसाच्या दृष्टीने योग्य नाही. खरेच त्यांना पाण्याची गरज असेल, तर त्यांनी राजकारण न करता गहुंजेवर पाणी उचलून न्यावे, असे शिवसेना उपतालूका प्रमुख भारत ठाकुर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button