breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी शनिवारपासून अर्जांचे वाटप  

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आयोजित पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी अर्ज वाटप करण्यात येणार आहेत.

बचतगटांच्या उत्पादनांची सर्वांना माहिती व्हावी, बचतगटातील महिलांना विक्री कौशल्ये ज्ञात व्हावीत याकरिता पवनाथडी जत्रा ४ जानेवारी २०१९ ते दिनांक ७ जानेवारी या कालावधीत सांगवी तील पीडब्लूडी मैदानावर भरविण्यात येणार आहे. पवनाथडी जत्रेमध्ये महिला बचतगटांना वस्तू विक्रीकरिता स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. स्टॉलसाठी अर्ज मिळणेकामी नागरिकांनी शनिवार (दि. १५) ते सोमवार (दि. 2४) या कालावधीपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यातील अर्ज नागरवस्ती विकास योजना विभागात वाटप करण्यात येणार आहेत.

मुदतीत आलेल्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. फक्त पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनीच अर्ज मिळणेकामी संपर्क साधावा, असे आवाहन नागरवस्ती विकास योजना विभागाने केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button