breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पवई तलावाजवळ बस उलटली, १ ठार

मुंबई: पवई तलावजवळ एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
विक्रोळीच्या दिशेनं जाणारी बस पवई तलावाजवळ उलटली. अपघात नेमका कसा झाला, हे कळू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. पाच जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button