breaking-newsआंतरराष्टीय

परवेझ मुशर्रफ यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी निवडणुकीत उभे राहण्यासाठी भरलेला उमेदवारीचा अर्ज पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुशर्रफांनी फेटाळून लावला आहे. यामुळे संसदीय निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुशर्रफ यांना मोठा दणका बसला आहे.

याबाबत पाकिस्तानी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावरील वृत्तानुसार, यासंदर्भात सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आली नाही. आयोगाकडून अर्ज फेटाळल्याचे स्पष्टीकरण दिले जाणार आहे.

आपल्या उमेदवारीचा अर्ज माजी लष्करशहा मुशर्रफ यांनी एनए-1 साठी छित्राल येथून दाखल केला होता. पण तो अर्ज निवडणूक आयोगाचे अधिकारी मोहम्मद खान यांनी रिजेक्‍ट केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत गेल्या आठवड्यातच गैरहजर राहिलेल्या मुशर्रफ यांना न्यायालयाने सशर्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली होती. ती अट अशी होती, की आपला उमेदवारी अर्ज मुशर्रफ दाखल करू शकतात. पण रिटर्निंग ऑफिसरकडून त्यांच्या अर्जाची छानणी ही केली जाईल. ती छानणी पास करण्यासाठी मुशर्रफ यांना न्यायालयात वैयक्तिक हजेरी लावावीच लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button