breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

परळमधल्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

मुंबई – परळमधल्या 17 मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर आग लागली आहे. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही आगलागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर लागलेली ही दुस-या श्रेणीची आग आता तिस-यावरून चौथ्या श्रेणीची झाली आहे. त्यामुळे इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. या आगीच्या धुरात 8 जण गुदमरल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button