breaking-newsआंतरराष्टीय

परमाणू निरस्त्रीकरणाबाबत ट्रम्प यांचा किमवर विश्‍वास

वॉशिंग्टन (अमेरिका) – परमाणू निरस्त्रीकरणाबाबत आपला उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांच्यावार पूर्ण विश्‍वास असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी ट्‌विट केले आहे. 12 जून रोजी डोनॉल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट होऊन आणि परमाणू निरस्त्रीकरण करारावर सह्या होऊनही परमाणू निरस्त्रीकरणाची स्थिती अद्याप स्पष्ट झालेले नाही. उलट उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिका ‘गॅंगस्टर’ सारखे वागत असल्याचा आरोप केला आहे.

तरीही ट्रम्प यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, किम जोंग उन आम्ही सह्या केलेल्या समझोत्याचे पालन करतील याबद्दल मला पूर्ण विश्‍वास आहे. उत्तर कोरियाच्या परमाणू निरस्त्रीकरणाबाबत आमचे एकमत झालेले आहे.
उत्तर कोरियावर विश्‍वास व्यक्‍त करत असतानाच ट्रम्प यांनी चीनवर कडाडून टीका केली आहे. या समझोत्यावर नकारात्मक दबाव टाकण्याचा चीन प्रयत्न करण्याची शक्‍यता असल्याचे ट्रम्प यांनी ट्विट केले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉंपियो यांनी नुकताच उत्तर कोरियाचा दौरा केला आहे. त्यांनी उत्तर कोरियाबरोबर झालेली चर्चा सफल झाली असून प्योंगयांगने एक मिसाईल सुविधा केंद्र नष्ट करण्याचे मान्य केल्याचे एका मुलाखतीत सांगितले. आणि त्याचबरोबर उत्तर कोरिया आपले परमाणू अस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करत नाही, तोपर्यंत प्रतिबंध चालूच राहणार असल्याची ग्वाही दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button