breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘पप्पू पास…मोदी नापास’, पप्पू कधी पप्पा झाला.. भाजपला कळंलच नाही, सोशल मीडियावर व्हायरल

पुणे  – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींत काॅंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली.  राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने आघाडी घेत भाजपाचा धुव्वा उडवला आहे. सोशल मीडिया निकालावर गंमतीशीर संदेश व्हायरल होवू लागले आहेत.

गतवर्षी राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. मंगळवारी याला वर्ष पूर्ण झाल्याने निवडणुकींमधील काँग्रेसचा विजय पाहता ‘पप्पू पास हो गया’ असे संदेश व्हायरल होत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालांबाबद मौन बाळगल्याने ‘पप्पू पास…पण मोदी नापास’ , पप्पू कधी पप्पा झाला, हे भाजपला कळंलच नाही, असे संदेश व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल होत आहे.

मागील लोकसभा निवडणूकीत इतर पक्षाचे नामोहरण करण्यास भाजपाकडून सोशल मीडियाचे शस्त्र मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण त्यांचे हे शस्त्र त्यांच्यावरच भारी पडले आहे. मोदी भक्तांसाठी हा निकाल धक्कादायक असल्याचे संदेश व्हॉटसअ‍ॅपवर फिरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button