breaking-newsराष्ट्रिय

पदावरून हटवल्यास पर्रिकर ब्लॅकमेल करण्याची मोदी-शाह यांना भीती-काँग्रेस

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती बिघडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही स्थिती असूनही त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह घेत नाहीत. कारण तसे केले तर मनोहर पर्रिकर राफेल करारावरून या ब्लॅकमेल करतील अशी भीती या दोघांना आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या संदर्भातला आरोप केला आहे. मला खात्री आहे की राफेल करार नेमका कसा झाला? त्यात काय काय घडले याची संपूर्ण माहिती मनोहर पर्रिकरांना आहे. कारण जेव्हा तो करार झाला तेव्हा ते संरक्षण मंत्री होते. त्याचमुळे त्यांची प्रकृती कितीही बिघडली त्यांना कितीही वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह त्यांचा राजीनामा घेणार नाहीत. कारण मनोहर पर्रिकर ब्लॅकमेल करतील अशी भीती या दोघांना आहे. असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून दोन आजारी मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा आमि वीज मंत्री पांडुरंग मकईकर हे दोघेही काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना वगळून त्यांच्या जागी दोन नव्या चेहेऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अशात आता काँग्रेसने मनोहर पर्रिकरांच्याही राजीनाम्याची मागणी केली असून सरकार आजारी पडत असेल तर आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी असाही टोला लगावला आहे. त्यामुळे येत्या काळात गोव्याच्या राजकारणात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button