breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पदाधिका-यांच्या मोबाईल सेवेवर सव्वाकोटी खर्चाचा “घाट”

  • आयुक्त श्रावण हार्डीकर यांची मान्यता
  • अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव स्थायीपुढे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना पालिकेतर्फे मोबाईल सीम दिले जाते, आणि त्याचे शूल्कही पालिका संबंधित कंपनीला अदा करते. या मोबाईल सेवेसाठी आगामी काळात 1 कोटी 25 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या मंजुरीने स्थायीसमोर मान्यतेसाठी आणला आहे.

 

पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांना मोबाईल सेवा उपभोगण्यापोटीचे शूल्क संबंधित कंपनीला महापालिकेतर्फे अदा केले जातात. त्यासाठी संबंधित व्यक्तीला विशिष्ट कंपनीचे सीम कार्ड दिले जाते. सीम कार्डचा वापर होईल, त्या तुलनेत आलेले कंपनीच्या बिलावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. आगामी काळात ही सेवा उपभोगण्यावर 1 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती.

 

मे. वोडाफोन, आयडीया आणि एअरटेल कंपनीचे निविदा दर प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये वोडाफोन कंपनीने 28.50 टक्के, आयडिया कंपनीने 26.00 टक्के आणि एअरटेल कंपनीने 10.50 टक्के कमी दर निश्चित केले आहेत. वोडाफोन कंपनीकडून हे काम करवून घेण्यासाठी त्यांच्यासोबत करारनामा करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button