breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्नी पिडित पुरुष संघटनेचे आंदोलन ; स्वतंत्र पुरुष तक्रार केंद्र स्थापनेची मागणी

औरंगाबाद – पत्नी पीडीत पुरुष आघाडी संघटनेतर्फे आज विभागीय आयुक्तालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात स्वतंत्र पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

जागतिक पुरुष हक्क दिनानिमित्त जिल्ह्यात स्वतंत्र पुरुष तक्रार केंद्र स्थापन करावे या सह घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे संरक्षण अधिनियम लागू करावा. वाढत्या लिंगभेदाला आवर घालावा, कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यास एक वर्षाच्या आत निकाली काढावा, प्रत्येक पोलिस ठाण्यात लाय डिटेक्टर बसवावे, पोटगी भरण्यास असमर्थ असणार्‍या व्यक्तीस जेलमध्ये न पाठवता सरकारी नोकरीत समाविष्ट करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

बायकोच्या त्रासामुळे पीडीत पतीच्या मनात आत्महत्या करावी की,  सन्‍यासी व्हावे असे विचार येतात. त्यामुळे आत्महत्या करण्याऐवजी संन्यासी होऊन जीवन जगावे असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button