breaking-newsराष्ट्रिय

पत्नीच्या नावाच्या त्रासाला कंटाळून पतीची पोलीस ठाण्यात धाव

कोझीकोड:  पत्नीच्या नावामुळे एका व्यक्तीच्या डोक्याला मनस्ताप झाला असून त्याने यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठले आहे. नुकतेच लग्न झालेल्या विभीष याच्या पत्नीचे नाव सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या नावाचा उच्चार नेमका करायचा तरी कसा असा प्रश्न लोक विचारत आहेत.

केरळमधील कोझीकोडमध्ये राहत असलेल्या विभीषचे ध्यानुरहनागिथी (Dhyanoorhanagithy) हिच्यासोबत लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासूनच त्याला पत्नीच्या नावाची चौकशी करणारे फोन येत आहेत. सतत येणाऱ्या फोनमुळे त्रस्त झालेल्या विभीषने सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

विभीष आणि ध्यानुरहनागिथी यांची लग्नपत्रिका कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आली होती. तेव्हापासूनच खरा हा त्रास सुरु झाला. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर वेगाने शेअर होऊ लागली आणि थोड्याच वेळात व्हायरल झाली. अनेकांनी तर नावाची थट्टा करत जो कोणी ध्यानुरहनागिथी नावाचा उच्चार करु शकेल त्यानेच लग्नाला यावं अशी खिल्ली उडवायला सुरुवात केली. पत्रिका व्हायरल झाल्यापासून विभीष आणि त्याच्या वडिलांचा मोबाइल फोन सतत वाजत आहे. अनेकांना या नावाबद्दल कुतुहूल होते, तर अनेकांना याचा अर्थ जाणून घ्यायचा होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button