breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पतीच्या त्रासाला कंटाळून एकोणीस वर्षीय पत्नीची आत्महत्या

पती टोचून बोलून शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 30 जून रोजी जनता वसाहत पर्वती येथे घडली.

स्नेहल गणेश कोंढाळकर (वय-19) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी भालचंद्र पवार यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी गणेश कोंढाकर (वय-29, रा.गल्ली नं 29, जनता वसाहत) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत स्नेहल हिचे आरोपी गणेश कोंढाळकर याच्याबरोबर नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यानतर ती सासरी नांदत असताना आरोपीने तिला टोचून बोलून तिचा शारीरीक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळूनच तिने 30 जून रोजी राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक के.डी.संकपाळ करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button