breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक फासावर लटकावले : राज ठाकरे

मुंबई  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या व्यंगचित्रातून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. सरकराने ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची मार्मिक टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली आहेत.

राज ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्यावेळेसही व्यंगचित्रातून भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्याला भाजपनेही व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिले होते. आता राज ठाकरे यांनी पुन्हा केंद्र सरकारवर व्यंगचित्रातून हल्ला केला आहे.

यापूर्वी 19 जानेवारीला राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. ”काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळतोय”, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदींना लगावला होता.  गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात रेखाटले.

https://twitter.com/RajThackeray/status/1086482454024724482

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button