breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या ‘पाक’ संबंधांचा शोध घ्या- अबू आझमी

नाशिक : भारतात जातीयवादाची विष पेरणी करणाऱ्या भाजप व आरएसएससह गुप्तचर यंत्रणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.

शहरातील वडाळा रोडवरील एक पटांगणात आयोजित लोकशाही बचाव सभेत आझमी यांनी पंतप्रधानांसह देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष रमजान पहिलवान, जमील सिद्दिकी, अजमल फारुखी, सूचिता चव्हाण, जिल्हाध्यक्ष रफिक सय्यद, महानगरप्रमुख इम्रान चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आझमी म्हणाले, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र निवडणुकांच्या तोंडावर काही राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आयोजित मंदिराचा मुद्दा उपस्थित करून वादग्रस्त विधाने करून देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणू पाहत आहे अशा राजकीय पक्षांची मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्द करावी, यासाठी मी पत्रव्यवहार केला आहे. कारण यांच्या पोळ्या भाजण्यासाठी देशात जातीयवाद उफाळून दंगली घडवून आणण्याचा समाजकंटक प्रयत्न हेतुपुरस्सर करीत असल्याचा आरोप आझमी यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button