breaking-newsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी हत्येचे सोलापूर कनेक्शन ? ; भाजप नेत्यांची फेसबुकवरील पोस्टमुळे खळबळ

सोलापूर – टेंभूर्णी (ता. माढा) येथे राहणा-या बापू कुबेर राजगुरु या तरुणाचे फेसबुक अकाउंट हॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची पोस्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी बापू राजगुरु यास चौकशीसाठी बोलाविले आहे.

मूळचा अकोला येथील बापू राजगुरु हा टेंभूर्णी परिसरात राहात आहे. त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची पोस्ट टाकण्यात आली. या संदर्भातील चौकशी करत गाझियाबाद पोलिस राजगुरु यांच्यापर्यंत पोहोचले. त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. यावेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीची कोणतीही पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली नाही, मला हिंदी भाषा सुद्धा येत नाही, असे राजगुरु याने पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटची तपासणी केली. त्याचे अकाऊंट हॅक करून कोणीतरी पंतप्रधानांविषयी पोस्ट टाकल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाचे सोलापूर कनेक्‍शन ? चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात.. अशी पोस्ट भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य, माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी फेसबुकवर शेअर केल्याने खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. तपासामध्ये बापू राजगुरु याचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भातील चौकशीकरिता राजगुरुला बोलावून घेतले आहे.
– वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक सोलापूर 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button