breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे सर्कशीतला वाघ, काँग्रेस नेत्याची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः वाघ असल्याच्या गर्जना करत आहेत. ते खरोखरच वाघ असतील मात्र वाघांमध्येही दोन प्रकार असतात, एक वाघ असतो जंगलातला आणि दुसरा असतो सर्कशीतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्कशीतला वाघ आहेत अशी टीका पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते मनप्रीत सिंग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्कशीतल्या वाघाप्रमाणे आहेत. कारण ते तसेच वागत आहेत असं मनप्रीत सिंग यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यामुळे भाजपाचे नेते काँग्रेसवर तुटून पडण्याची चिन्हं आहेत.

ANI

@ANI

Punjab Minister Manpreet Singh: Yeh (PM Modi) apne aap ko hindustan ka sher kehte hai, vakai sher honge par sher bhi do kisam ka hota hai. Ek jungle ka sher hota hai, ek circus ka sher hota hai. So hume toh yeh circus ke sher lagte hain.

224 people are talking about this

लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा बाकी आहे. अशात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात शाब्दिक चकमक रोजच होताना दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना महामिलावटी म्हणत आहेत. तर अमित शाह हेदेखील काँग्रेसच्या टीकेला तोडीस तोड उत्तर देत आहेत. दुसरीकडे काँग्रेस असेल किंवा तृणमूल काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राईकच्या ढगाळ वातावरणावरून जे वक्तव्य एका मुलाखतीदरम्यान केलं होतं त्यावरून आज राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी संघावर टीका केली आहे. अशात आता पंजाबमधले मंत्री आणि काँग्रेसचे नेते मनप्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्कशीतला वाघ म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button