breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन

पिंपरी – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या वडमुखवाडी येथील गृहप्रकल्प, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासह चिंचवडच्या चापेकर स्मारकांच्या दुस-या टप्प्यातील कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते येत्या (सोमवारी दि.23) करण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.

पवार म्हणाले की, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाच्या दुस-या टप्प्याचे काम सुरु आहे. हे काम महापालिका आणि चिंचवडची चापेकर स्मारक समिती तर्फे सुरु आहे. या स्मारकांच्या दुस-या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये स्मारकांच्या कामामध्ये चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर संग्रहालय बांधण्यात येणार आहे.

सत्ताधारी भाजपच्या वतीने सर्वासाठी घरे अभियानातून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना घरे बांधण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात तब्बल दहा हजार घरे बांधली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून च-होली, डुडुळगाव, रावेत, दिघी, मोशी, वडमुखवाडी, चिखली, पिंपरी आणि आकुर्डी अशा 10 ठिकाणी घरकुल प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या घरासाठी तब्बल एक लाखाहून अधिक अर्ज महापालिकेकडे प्राप्त झालेले आहेत. या प्रकल्पापैकी डुडुळगाव येथील गृह प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यातील वडमुखवाडीच्या गृहप्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे हस्ते भुमिपुजन केले जाणार आहे. तसेच महापालिकेच्या मोशीत ‘वेस्टू टू इनर्जी’चा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.  त्या कामाचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपकडून विविध प्रकल्पाचे भूमिपुजन येत्या सोमवारी होणार आहे. परंतू, भूमिपुजनानंतर कार्यक्रम कुठे घ्यायचा हे ठिकाण अद्याप ठरले नसल्याचेही पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button