breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पंढरपूरमध्ये बंदला शंभर टक्के प्रतिसाद

पंढरपूर –  मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या पंढरपूरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. शाळा व महाविद्यालये देखील बंद होती. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन, तीन ठिकाणी टायर पेटवण्याच्या घटना घडल्या.

आज (गुरुवार) सकाळ पासून शहरातील सर्वच भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहर कडेकोट बंद होते. एसटी आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दर महिन्याच्या एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्याप्रमाणे दोन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी वाढली होती. आज व्दादशी दिवशी बंद मुळे एस.टी वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना पंढरपुरातून परत गावी जाण्यात अडचण निर्माण झाली. अशा परिस्थितीत बहुतांष भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.

सकाळी शिवाजी चौकात मराठा समाजबांधवांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी मोटारसायकल वरुन शहरातून फिरुन शांततेचे आवाहन केले. तथापी काही कार्यकर्ते गटागटाने शहरात फिरत होते. शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अशा ही परिरस्थितीत नाथ चौक आणि सरगम चौकात काही कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शहराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर कार्यकर्त्यानी चक्का जाम आंदोलन करत रस्ते अडवून धरल्याने अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button