breaking-newsक्रिडा

पंजाबसमोर आज बंगळुरूचे कडवे आव्हान

मोहाली – लागोपाठ दोन पराभवांनंतर प्लेऑफ्स मधिल आपले स्थान राखण्यासाठी पंजाबला विजयाची गरज असताना आज त्यांची लढत आपले मागील दोन्हीही सामने जिंकून मालिकेत पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या बंगळुरूशी होणार आहे. आयपीएलच्या अकराव्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबने आतापर्यंत आपल्या अकरा पैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे तर पाच सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा मोसम खुप कठीण गेला असून त्यांना आपल्या अकरा सामन्यांपैकी तब्बल सात सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे तर केवळ चार सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. त्यात आपल्या अखेरच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने त्यांच्या बाद फेरीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आजचा सामना पंजाब आणि बंगळुरूच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

त्यातच सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा सामना गमावल्यानंतर बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीकडे प्रतिक्रियेसाठी शब्द नव्हते. संघाच्या वृत्तीबाबतही त्याने आपले मत प्रकट केले. 147चे लक्ष्य पेलताना आलेले अपयश तो लपवू शकला नव्हता. तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात बेंगळूरुच्या फलंदाजांना जेमतेम 127 धावा करता आल्या होत्या. बेंगळूरुचा संघ कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यावर बराचसा अवलंबून दिसला. कोहलीच्या नावावर सर्वाधिक 466 धावा (51.77 धावांची सरासरी) आहेत. मनदीप सिंग, क्विंटन डी कॉक आणि ब्रॅंडन मॅक्क्‌युलम यांनी आता गरजेच्या वेळी अपेक्षांची पूर्तता करणारी कामगिरी करायला हवी.

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आतापर्यंत अपयशी ठरला आहे. त्याने 48 धावांच्या सरासरीने फक्त 4 बळी मिळवले आहेत. वेगवान गोलंदाज टिम साऊदी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज सातत्यपूर्ण प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना सांघिक कामगिरी गरज आहे. तर दुसरीकडे पंजाबची संपुर्ण फलंदाजी केवळ लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांच्यावर अवलंबून आहे त्यामुळे गेल अथवा राहुल बाद झाल्यास त्यांची फलंदाजी ढेपाळते. मालिकेत  आता पर्यंत त्यांच्या मधल्या फळीतील करुन नायर, मयंक अग्रवाल, ऍरोन फिंच, युवराज सिंग, मनोज तीवारी सारख्या बलाढ्य फलंदाजांना आपल्या लौकीकास साजेशी कामगीरी करता न आल्याने मागील दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर इतर सामन्यात चालणारी त्यांची गोलंदाजी कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरली. त्यांच्या गोलंदाजांनी सामन्यात तब्बल 245 धावा देत संघाला अडचणीत आणले होते त्या मुळे बाद फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवायच्या असल्यास त्यांना आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ – 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु– विराट कोहली (कर्णधार), ए.बी.डिव्हिलीअर्स, सर्फराज खान, ख्रीस वोक्‍स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्कूलम, वॉशिंग्टन सूंदर, नवदीप सैनी, क्विंटन डि कॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम.अश्‍विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरुद्ध जोशी.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रवीचंद्रन अश्‍विन (कर्णधार), अक्षर पटेल, के.एल.राहुल, अँडृ टाय, ऍरोन फिंच, मार्कस स्टोनिस, करुन नायर, मुजीब झारदान, अंकित सिंग राजपूत, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा, बरिंदर सिंग सरन, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन ड्‌वारसिअस, अक्षदीप नाथ, मनोज तिवारी, मयंक अग्रवाल, मंझूर दर, प्रदीप साहु, मयंक डगर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button