breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंकजा मुंडे यांच्या घरात दारुची भट्टी, धनंजय मुंडे यांचा घणाघात

बीड – ‘आमच्या बहीणाबाईच्या घरात सर्व सत्ता आहेत. खासदारकी त्यांच्या घरात, आमदारकी त्यांच्या घरात, राज्याचे मंत्रीपद त्यांच्याच घरात, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, वैद्यनाथ बँक आणि सहकारी साखर कारखाना त्यांच्याच घरात, दारूची फॅक्टरी त्यांच्याच घरात’ असा घणाघाती आरोप धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत केला आहे.

माजलगाव येथील कार्यकर्ता मेळावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे यांची उपस्थिती होती.

‘बीड जिल्ह्यातील जनतेने आमदारकी, खासदारकी, राज्यची सत्ता, केंद्राची सत्ता, जिल्ह्याची सत्ता एकाच घरात दिली. पण, त्यांनी जनतेला काय दिलं, असा सवाल धनंजय मुंडे उपस्थिती केला. साधा ऊसतोड मजुरांचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. उलट, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच्या नावाने गोपीनाथ गडावरून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ऊसतोड मजूर महामंडळाचे काय झालं’ असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले.

ते पुढे म्हणाले की, ‘पंकजा मुंडे मंत्री मंडळात आहेत. एखादं महामंडळ जर रद्द करायचं तर मंत्री मंडळाची बैठक घेवून तो विषय रद्द करायचा असतो. महामंडळ रद्द करायच्या बैठकीत स्वत:च्या वडिलांच्या नावाने काढलेलं ऊसतोड मजूर महामंडळ रद्द करताना मंत्री म्हणून मुंडे साहेबांच्या वारसाची सही असेल तर कीती दुर्दैव आहे.’ असा आरोप धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button