breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

न्यायालयाचा अवमान  करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी। नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबत बोलताना आम्ही सुप्रिम कोर्टाला मानत नाही. राम मंदिर हा श्रद्धेचा व भावनेचा विषय आहे. त्याचा निवाडा कोर्ट करु शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. याप्रकरणी खासदार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  सामाजिक कार्यकर्त्या अंजना गायकवाड यांनी केली आहे.

 

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर या विषयी बोलताना, आम्ही  राम  मंदिराच्या विषयात सुप्रिम कोर्टाला मानत  नाही. राम  मंदिर  हा  श्रद्धेचा  भावनेचा  विषय  आहे . यात कोर्ट निवाडा करू शकत नाही , असे वादग्रस्त व देशविरोधी  विधान केले.

संजय राऊत हे एक संसद सदस्य म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. सुप्रिम कोर्ट ही देशाची सर्वोच्य न्यायपालिका आहे. त्याचा मान राखणे व  त्याच्या  नियमांचं  पालन  करण  हे  प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे.

राम  मंदिर हा विषय अतिशय संवेदनशील आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे  असतानादेखील खासदार राऊत यांच्यासारखे  लोकप्रतिनिधी  देश्याच्या  सर्वोच्य न्यायव्यवस्थेला मानायला तयार होत नाहीत. न्यायालयाचा अवमान करणारी विधान खुलेआम बोलतात अशा लोकांना  वेळीच  आवर घातली पाहिजे.

सदर निवेदन देताना अंजना गायकवाड, धम्मराज साळवे, संतोष शिंदे, मेघा आठवले, विकास कडलक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button