breaking-newsपुणे

नैराश्यामुळे डॉक्टरची आत्महत्या, पुण्यातील घटना

पुण्यातील एका डॉक्टरांने नैराश्यामुळे पुना हॉस्पिटलमधील विश्रांती कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली.  सोमवारी सकाळी ही घटना घडली. शशिकांत बंब (वय ६३) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुना हॉस्पिटलमध्ये शशिकांत बंब हे डेंटिस्ट होते. ते आज सकाळी विश्रांती कक्षात आराम करण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही वेळाने दुसरे डॉक्टर विश्रांती कक्षात गेल्यानंतर शशिकांत बंब यांनी गळफास घेतल्याचे दिसले. बंब यांच्याजवळ सुसाइड नोट सापडली असून माझ्या मृत्यूस कोणाला कारणीभूत धरू नये. नैराश्यामुळे हे पाऊल उचल्याचे त्यांनी त्यात म्हटल्याचे, पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button