breaking-newsआंतरराष्टीय

नेपाळ मध्ये जनकपुर ते अयोध्या थेट बससेवा सुरू

जनकपुर – नेपाळ मधील जनकपुर या शहरापासून भारतातील अयोध्या शहरापर्यंतची थेट बससेवा सुरू करण्यात आली असून या बससेवेच उद्‌घाटन काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तपणे करण्यात आले. ही दोन्ही रामयणकालीन पौराणिक महत्वाची शहरे त्यामुळे आता थेट बससेवेमुळे जोडली गेली आहेत. हा एक ऐतिहासिक क्षण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जनकपुर हे रामाची पत्नी सीता हिचे गाव असल्याचे मानले जाते. तेथे सीतामातेचे एक मंदिरही आहे. विसाव्या शतकात उभारण्यात आलेल्या मंदिरात जाऊन मोदींनी तेथे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी या बससेवेचे उद्‌घाटन केले.

भारत सरकारने भारतातातील रामायण कालिन पंधरा स्थळांचा रामायण सर्किट योजनेतून विकास करण्याची योजना आखली आहे. त्यातच आता जनकपुर पासून थेट अयोध्येपर्यंतची बससेवा नेपाळ सरकारने सुरू केल्याने मोदींनी नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे आभार मानले. सीता मातेचे वडिल राजा जनक यांची ही नगरी मानली जाते.
तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आगमन झाले. त्यावेळी त्यांचे संरक्षण मंत्री ईश्‍वर पोखरियाल यांनी त्यांचे स्वागत केले. नेपाळ मध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यावर भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा नेपाळ दौरा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button