breaking-newsआंतरराष्टीय

नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पामध्ये बॉम्बस्फोट

काठमांडू – नेपाळमध्ये भारताच्या मदतीने उभारण्यात येत असलेल्या मुख्य जलविद्युत प्रकल्पामध्ये आज एक बॉम्बस्फोट झाला. अशा प्रकल्पामध्ये महिन्याभरात झालेला हा दुसरा स्फोट आहे. राजधानी काठमांडूपासून 500 किलोमीटरवरील तुमलिंगतार येथील “अरुण 3′ या प्रकल्पामध्ये एका अनोळखी गटाने काल “आयईडी’च्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणला होता.

या स्फोटामुळे प्रकल्पाची कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर प्रकल्पाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

29 एप्रिल रोजी कम्युनिस्ट पार्टी नेपाळच्या माओवादी गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होण्यापूर्वी काही आठवडे आगोदर याच प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये स्फोट घडवून आणला होता. “अरुण 3′ प्रकल्पासाठी भारत सरकारच्या सतलज जलविद्युत निगमबरोबर 25 नोव्हेंबर 2014 रोजी करार करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button