breaking-newsराष्ट्रिय

नीरव मोदी अजूनही भारताच्या पासपोर्टवर करतोय विश्वभ्रमंती !

नवी दिल्‍ली : पीएनबी बँकेला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीने आठवड्याभरापूर्वीच भारतीय पासपोर्टवर प्रवास केला होता. 12 जूनला नीरव मोदीने युरोस्टार हाय स्पीडने ब्रिटनची राजधानी लंडन ते बेल्जियमच्या ब्रसेल्स असा प्रवास केला होता. याआधी भारतीय पासपोर्ट रद्द होऊनही नीरवने चार देशांमध्ये विमान प्रवास केला होता. मात्र 12 जून रोजी ब्रसेल्सला जाण्यासाठी त्यानं विमानाऐवजी रेल्वेला प्राधान्य दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय अधिकाऱ्यांनी युरोपच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे याबद्दलची माहिती मागितली आहे. युरोपीय अधिकाऱ्यांनी नीरवच्या पासपोर्टची माहिती जमा केली होती. विशेष म्हणजे नीरव मोदीचा पासपोर्ट 24 जानेवारीला रद्द करण्यात आला आहे. याशिवाय 11 जूनला सीबीआयनं इंटरपोलला नीरवविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची विनंती केली होती. सीबीआयनं नीरवविरोधात आरोपपत्र दाखल केल्यावर ही विनंती केली होती. याआधी आरोपपत्र दाखल करण्यात आलं नसल्यानं इंटरपोलनं नीरवच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली नव्हती.

सीबीआयनं इंटरपोलकडे नुकतीच मदत मागितली. याचाच फायदा घेत नीरवनं लंडन ते ब्रसेल्स प्रवास केला. ‘तपास यंत्रणांनी याबद्दलची माहिती दिल्यावरच नीरव भारतीय पासपोर्टवर अद्याप कसा प्रवास करतो आहे, याविषयी भाष्य करता येईल,’ असं परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची आणि त्याच्या प्रवासावर निर्बंध आणले गेल्याची माहिती तपास यंत्रणांकडून इंटरपोलला देण्यात येत आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button