breaking-newsपुणेमहाराष्ट्र

निवडणूक आयोगातर्फे पर्वती मतदारसंघाची निवडणूक नाव नोंदणी मोहीम सुरू

 

पुणे – विधानसभा मतदारसंघाच्या पर्वती मतदारसंघातील एक जानेवारी 2019 वर आधारित छायाचित्र मतदार यादीचा स्पेशल रिव्हिजन म्हणजेच अद्यावतीकरण सुरू झाले आहे. दि. 15 मे 2018 ते सहा जुलै 2018 पर्यंत मतदारयाद्यांमध्ये सर्व मतदारांचे शंभर टक्के रंगीत फोटो टाकण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्याच्या अद्ययावतीकरणास प्रारंभ केला आहे. त्या अंतर्गत मतदारांचे ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो बदलून रंगीत फोटो लावण्यात येत आहेत. तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत, अशा मतदारांचे रंगीत फोटो गोळा करण्यात येत आहे. मतदारयादीमधील दुबार, मृत आणि स्थलांतरित व्यक्‍तींची नावे वगळण्यात येत आहे. चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्याची मोहीम सुरू आहे.

मतदारयादी अद्ययावतीकरण मोहिमेदरम्यान 15 मे ते सहा जुलै 2018 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. प्रारूप मतदार यादी दि. 31 ऑगस्ट 2018 पर्यंत तयार केली जाणार असून, एक सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर दि. 31 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून, दि. 4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

पर्वती विधानसभा मतदारसंघाची अंतीम मतदार यादी यापूर्वी 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. या यादीमध्ये फोटो नसलेल्या मतदारांची संख्या तब्बल 31 हजार 146 इतकी आहे. तर 43 हजार 249 मतदारांचे फोटो ब्लॅंक ऍण्ड व्हाईट स्वरूपातील आहेत. या मतदारांना आपले फोटो मतदार नोंदणी अधिकारी, 212 पर्वती विधानसभा मतदार संघ, जुनी जिल्हा परिषद इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात जमा करता येणार आहे. सहा जुलै 2018 पर्यंत फोटो जमा न करणाऱ्या मतदार त्यांचे नाव वगळणीला पात्र राहतील, असे आवाहन नोंदणी अधिकाऱ्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button