breaking-newsआंतरराष्टीय

निवडणुकीसाठी लष्कराची मदत पाहिजे – पाकिस्तान निवडणूक आयोग

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान 25 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी लष्कराची मदत आवश्‍यक असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मतदान केंद्राची सुरक्षितता, मतपत्रिकांची छपाई आणि संपूर्ण देशात मतपत्रिकांचे वितरण आदी कामांसाठी निवडणूक आयोगाने आज लष्कराची मदत मागितली आहे.

स्थानिक स्पर्धेमुळे हिंसाचार भडकण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी आणि दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची शक्‍यता असणाऱ्या ठिकाणी लष्कराचे जवान तैनात केले जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. मतपत्रिकांची छपाई आणि वितरणाचे कामही लष्कराकडे देण्यात येणार आहे. पाकिस्तानातील निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी लष्कराची मदत घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सन 2013 च्या निवडणुकीतही लष्कराची मदत घेण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button