breaking-newsराष्ट्रिय

निर्धास्तपणे मतदान करा! पेपरट्रेल मशिन छायाचित्र टिपत नाही!

निवडणूक आयोग मतदारांना देणार खात्री 
नवी दिल्ली: निर्धास्तपणे मतदान करा! पेपरट्रेल मशिन कुठले छायाचित्र टिपत नाही, अशी मतदारांना खात्री देण्यासाठी निवडणूक आयोग मोहीम हाती घेणार आहे. पेपरट्रेल मशिनबाबतच्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नका, असे आवाहनही आयोगाने केले आहे.
मतासाठी पैसे घेतल्याने विशिष्ट उमेदवारालाच मतदान करा. मतदान करतानाचे तुमचे छायाचित्र पेपरट्रेल मशिन टिपते. त्यामुळे पैसे स्वीकारून तुम्ही आम्हाला मूर्ख बनवू शकत नाही, अशा धमक्‍या मतदारांना दिल्या जात असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. यापार्श्‍वभूमीवर, मतांसाठी पैसे देणाऱ्यांकडून मतदारांना धमकावले जाऊ शकते. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) कुठले बटण तुम्ही दाबले ते आम्हाला समजते, असे त्यांच्याकडून भासवले जाऊ शकते. मात्र, पेपरट्रेल मशिन छायाचित्र टिपते या केवळ अफवा आहेत. मतदारांनी त्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे. पेपरट्रेल मशिनकडून गोपनीयतेचा कुठलाही भंग होत नाही. ही बाब मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी निवडणूक आयोग मोहीम हाती घेईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
ईव्हीएमच्या विश्‍वासार्हतेवर बहुतांश विरोधी पक्षांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पेपरट्रेल मशिनच्या वापरावर भर दिला आहे. ते मशिन वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडीट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) या नावाने ओळखले जाते. ते ईव्हीएमला जोडले जाते. एखाद्या मतदाराने मतदान केल्यावर ते अचूकपणे नोंदले गेल्याचे त्याला पेपरट्रेर मशिनमधूून मिळणाऱ्या पावतीमुळे कळते. त्या पावतीवर ज्या उमेदवाराला मतदान केले; त्याच्या पक्षाचे चिन्ह उमटते. पेपरट्रेल मशिनच्या छोट्या विंडोवर ती पावती सुमारे सात सेकंद झळकते. त्यानंतर ती एका बॉक्‍समध्ये पडते. ती पावती मतदाराच्या हाती पडत नाही.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button