breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास यश हमखास; एकनाथ पवार यांचे प्रतिपादन

  • शाळा प्रवेशानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत
  • विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेत वाटप

 

पिंपरी – आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य घडविणार आहेत. त्यासाठी त्यांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाते. शालेय साहित्यांपासून ते सर्व खर्च शासना करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यासाचे नियोजन केल्यास यश निश्चित मिळते, असे, प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

 

शैक्षणिक वर्ष २०१८–१९ ला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी पिंपरी–चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या १३० शाळांमधील मुलांना शैक्षणिक साहित्य यामध्ये गणवेश, पीटी गणवेश, स्वेटर, वह्या, पुस्तके वाटप उपक्रमाला पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक ५४ येथे सुरुवात झाली, त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी स्थायी समिती सदस्य विलास मडेगिरी, शहर भाजप प्रवक्ता अमोल थोरात, नगरसेविका उषा मुंडे, स्थायी समिती सदस्य सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, नगरसेविका माधवी राजापूरे यांच्यासह शाळेतील शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

 

दरम्यान, पिंपळे गुरव येथे प्राथमिक शाळांमध्ये खाऊवाटप, ड्राँईगवही वाटप, प्रभातफेरी, बालवाडी व इयता १ ली ते ८ वीचे वर्ग सजावट व मनोरंजन कार्यक्रम, मोफत साहित्य वाटप करण्यात आले. थेरगावमधील शाळांमध्ये पोवाडे, प्रबोधनपर भारुड, प्रभातफेरी, १ लीच्या वर्गाची सजावट, मुलांचे स्वागत, मोफत साहित्य वाटप उपक्रम घेण्यात आले. तसेच, दिघी येथील मुले-कन्या शाळेत खाऊवाटप, प्रभातफेरी, फुगे-फुले वाटून मुलांचे स्वागत केले. तसेच, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. चिंचवड स्टेशन परिसरातील प्राथमिक शाळेत मुलांचे स्वागत, प्रभात फेरी, पथनाट्य, बालगीते, समरगीतांच्या ध्वनीफित ऐकविण्यात आले. यासह अजंठानगर मुले-कन्या शाळेत वर्ग सजावट, १ लीच्या मुलांचे फुगे व फुले वाटून स्वागत करण्यात आले. मोफत साहित्य वाटप, मनोरंजनात्मक कार्यक्रम यावेळी पार पडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button